सावंतवाडीचा किशोर वालावलकर प्रथम:स्पर्धेच्या आयोजना विषयी स्पर्धकांनी मानले आभार..
⚡कुडाळ ता.१४-: महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित आगळ्या वेगळ्या विषयावरील निबंध स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला. या स्पर्धेत सालईवाडा सावंतवाडी येथील किशोर अरविंद वालावलकर याने प्रथम क्रमांक पटकावला.
शहरी भागात आता कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणावर होत आहेत. मानवाच्या प्रगतीप्रमाणे शहराची सुद्धा प्रचंड वेगाने प्रगती होत आहे.यामध्ये बांधकाम आणि बिल्डर्स यांचा सहभाग मोठा आहे. परंतु काही बिल्डर्स लाॅबी स्वःस्वार्थासाठी प्रशासनाला पैसे चारुन सामान्य माणसांना डोकेदुखी देण्याचे काम करताना दिसते. या मध्ये खुली जागा नियमात सोडायची असते परंतु ती विकणे, पार्किंग नियमात फ्री असताना ते विक्री करणे ,ड्रेनेज ,सि व्हेज वाॅटर नियोजन न करणे ,रेरा कायद्याचे उल्लंघन करणे. असे प्रकार धनदांडगे असल्याने बेधडक करत असतात. प्रशासन हातात असल्याने आमचे कोणी काही करू शकत नाही. अशी भावना यांची असते. या सर्व बाबींची जनजागृती व्हावी म्हणून,अशा आगळ्या वेगळ्या विषयावर मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी खुली निबंध स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे परीक्षण मराठी भाषेच्या उच्चशिक्षित प्रोसेसर यांनी केले.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक- किशोर अरविंद वालावलकर (सालेवाडा, सावंतवाडी) विषय > बिल्डर शहराचे विकासक की भकासक, द्वितीय क्रमांक- सौ. आर्या आनंद बागवे (हुमरमाळा कुडाळ) विषय < बिल्डर शहराचे विकासक की भकासक, तृतीय क्रमांक- नियोजिता अनिल नाईक (माजगाव सावंतवाडी) विषय < सांडपाणी व्यवस्था भविष्यातील शहरांची डोकेदुखी. या विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे प्रथम क्रमांक रोख 3333 आणि चषक,, द्वितीय 2222 आणि चषक, तृतीय 1111 आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, विद्यार्थी सेना यतीन माजगावकर, विभाग अध्यक्ष शैलेश हडकर, माजी तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, विभाग अध्यक्ष प्रथमेश धुरी,अक्षय जोशी उपस्थित होते. या स्पर्धेच्या आयोजना विषयी स्पर्धकांनी आयोजकांचे आभार मानले.