⚡सावंतवाडी ता.१३-: सावंतवाडी शहरातील बॅ. नाथ पै सभागृह सावंतवाडी येथे दिनांक ३१ मार्च २०१९ रोजी हा गुन्हा घडलेला होता. खाजगी प्राथमिक शाळा आंबेगांव, म्हारकाटेवाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे शिक्षक म्हणुन कार्यरत असलेले प्रशांत सहदेव कदम, रा. आंबेगांव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग यानी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०१९ च्या अनुशंगाने जिल्हाधिकार व जिल्हा निवडणुक अधिकारी सिंधुदुर्ग यांनी इतर मतदान अधिकारी म्हणुन नेमणुक करून त्यांना दिनांक ३१ मार्च २०१९ रोजी बॅ. नाथ पै सभागृह सावंतवाडी येथे निवडणुक प्रशिक्षण नेमलेले असताना व तसे त्यांना आदेश बजावलेले असतानाही त्यांनी लोकप्रतिनीधित्व अधिकारी १९५१ चे कलम १३४ अन्वये गुन्हा केल्याने त्यांच्या विरूद्ध कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले होते. आरोपी तर्फे अॅड. परिमल नाईक यांचा युक्तीवाद ग्राह्य मानुन आरोपी यांची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सावंतवाडी यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपी तर्फे अॅड. परिमल नाईक, अॅड. सुशिल राजगे, अॅड. राहुल मडगांवकर, अॅड. रश्मी नाईक यांनी काम पाहीले.
निवडणुक प्रशिक्षणास गैरहजर राहुन गुन्हा केल्याच्या आरोपातुन आरोपीची निर्दोष मुक्तता…
