योगाकडे करिअर म्हणून पहा:गावडेकाका महाराज…

⚡बांदा ता.१३-: योगाकडे पाहाताना आपल्या करीयर सोबत समाजातील घटकाला योगाचा फायदा कसा करून देता येईल ते पहा. एखाद्या गरीब कुटुबांतील व्यक्तीला, मुलाला योगातून समाज सेवा म्हणुन मदत करा. हि खरी परमेश्वराची सेवा होईल. बदलती जीवन शैली आपणाला घडवीण्यासाठी आहे. पण हे करत असताना आपली संस्कृती जपली पाहीजे. यावर्षीपासून रोगानुसार योग हि संकल्पना श्री सदगुरू भक्त सेवा न्यास या संस्थेच्या माध्यमातून समाजातील लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी राबवीली जाईल असे आश्वासन सद्गुरू श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. गावडेकाका महाराज यांनी येथे दिले.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मान्यता प्राप्त श्री सदगुरू भक्त सेवा न्यास संस्थेच्या माध्यमातून आयोजीत पहील्या पदवीका शिक्षणक्रम डिल्पोमा कोर्स या वर्गात ५२ विद्यार्थी सहभागी झाले होते. या वर्गाच्या अंतिम प्रात्याक्षीक परीक्षेसाठी डॉ. संगीता तुपकर व नितीन बाबार्डेकर कुडाळ प्रमुख परीक्षक म्हणुन उपस्थित होते.
या कार्यक्रमात गावडेकाका महाराज, दत्तात्रय किनळेकर (अध्यक्ष सामाजीक संस्था) एकनाथ गावडे, सचीव राकेश केसरकर, गौरव मुंज, आंतरराष्ट्रीय योग शिक्षक आनंद सावंत,‌ दिलीप सुतार, सौ. केसर‌ वानीवडेकर, प्रथमेश गिरीधर गावडे हे योगा शिक्षक उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आनंद सावंत यांनी केले. तर आभार राकेश केसरकर यानी मानले.
फोटो :-
श्री सदगुरू भक्त सेवा न्यास आयोजीत योग पदवीका शिक्षणक्रम समारोप वेळी मार्गदर्शन करताना प. पू. सदगुरू श्री गावडे काका महाराज. सोबत नितीन बाबार्डेकर, संगीता तुपकर, दत्तात्रय किनळेकर, एकनाथ गावडे व इतर.

You cannot copy content of this page