जिमखाना मित्र मंडळ ग्रुप तर्फे शालेय मुलांना वह्या वाटप….

अजित सांगेलकरांचा पुढाकार; सर्व स्तरातून उपक्रमाचे कौतुक..

सावंतवाडी ता.११-: येथील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आज जिमखाना मित्र मंडळ ग्रुप तर्फे वह्या वाटप करण्यात आले. येथील युवा नेते अजित सांगेलकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबिवण्यात आला. त्यांच्या या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

यावेळी सचिन केसरकर, सचिन इंगळे ,सचिव संदीप इंगळे ,खजिनदार अमित सावंत, सचिव फैयाज शेख ,बाबू केसरकर ,नाना शितोळे ,आदी उपस्थित होते.

दरम्यान या कार्यक्रमासाठी सहकार्य केलेल्या बाबू सावंत नाटेकर, प्रवीण परब,गुरव बाबा टोपले, कुणाल मळगावकर, सतीश आकेरकर,यांनी कार्यक्रमाला हातभार लावल्याबद्दल श्री सांगेलकर यांनी त्यांचे देखील आभार मानले.

You cannot copy content of this page