परशुराम उपरकर: जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे तक्रार..
⚡कणकवली ता.११-: जिल्हाधिकारी कार्यालयाकडून व्हिडिओ गेम परवाना खेळांतर्गत घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी व्हिडिओ गेम पार्लर ठिकाणी व्हिडिओ गेमच्या नावाखाली अवैधरित्या जुगार सुरु आहे, याची तपासणी प्रशासनाने करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी माजी आमदार यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
त्या पोलीस विभागाकडून कुडाळ तालुक्यातील काही व्हिडिओ गेम परवाने रद्द करण्यात आले, असे समजते. सदर तक्रारदारांनी या तक्रारी केल्यानंतर काही कारवाई झाल्यानंतर व्हिडिओ गेमच्या मालकांकडून मोठ्या प्रमाणात खंडणी मागितली आहे, अशी तक्रार उपरकर यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. खंडणी मागणी संदर्भातील व्हायरल ऑडिओ क्लिफ देखील त्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना पाठवली आहे.
