⚡कणकवली ता.१०-: शहरातील सर्व्हिस रोडवर अनधिकृतपणे वाहने पार्किंग केली जात आहेत. परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सदर रोडवर चालक बिनधास्तपणे वाहने पार्क करीत असल्याने हा रोड पार्किंग झोन बनल्याचे चित्र आहे.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामांतर्गत शहरात उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली. कणकवली शहरात ये-जा करण्यासाठी सर्व्हिस रोडचीनिर्मिती करण्यात आली. मात्र, या रोडवर सध्या बिनाधास्तपणे चालक वाहने पार्क करून ठेवतात. परिणामी ही वाहने वाहतुकीस अडथळा ठरत असून वारंवार वाहतूक कोंडी आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत.
काही विव्रेत्यांनी सर्व्हिस रोडवर दुकाने थाटली आहेत. ही दुकाने वाहतुकीस अडथळा ठरण्यास आणखी भर पडली. सर्व्हिस रोडवर अनधिकृतपणे वाहन पार्क करणारे व दुकाने थाटणार्यांवर नगरपंचायत प्रशासन व वाहतूक पोलिसांनी काही दिवसांपूर्वी कारवाई बडगा उगारला होता. या कारवाईमुळे वाहने पार्क करणारे चालक व दुकाने थाटणारे विव्रेते धास्तावले होते. मात्र, पुन्हा एकदा सर्व्हिस रोडवर गाडी पार्क करण्याचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय काही विव्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. परिणामी सर्व्हिस रोडवरून चालकांना वाहन चालवणे अवघड बनले असून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व्हिस रोडवर वाहन पार्क करणार्या चालकांवर व दुकाने थाटणार्या विक्रेत्यांवर कारवाई न. पं. प्रशासन व वाहतूक पोलिसांनी कारवाई करून सर्व्हिस रोड पार्किंग व दुकानेमुक्त करावा, अशी मागणी आहे.
सर्व्हिस रोड बनला पार्किंग झोन
