गेम्स पार्लर बंद करण्याची धमकी…

राजकीय व्यक्ती असल्याचे भांडवल: कारवाईची मागणी..

⚡कुडाळ ता.०२-: कुडाळ येथील एकानी राजकीय भांडवल करून व्हिडिअो गेम पार्लर बंद करण्याची धमकी आम्हाला देत आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणेने या प्रकरणाची शहानिशा करून कदम नामक व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कुडाळ पोलीस निरीक्षक यांच्याकडे रवींद्र पालकर, मुजाब शेख, आत्मराम सावंत यांनी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कदम ही व्यक्ती राजकीय भांडवल करून व्हिडीअो गेम पार्लर व्यवसाय बंद करण्याची धमकी देत आहे. यापूर्वी सदर व्यक्तीने आमच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र, अाम्ही त्यांना पैसे देण्याचे टाळले. हा राग त्यांच्या मनात असल्याने आकसबुद्धीने कदमही व्यक्ती व्हिडिअो गेम पार्लरवर बंदी अाणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे सदर व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्य़ांनी केली आहे.

You cannot copy content of this page