⚡ओरोस ता.०२-: जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त नशाबंदी मंडळ व जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालयात जनजागृतीपर कार्यक्रम पार पडला.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. श्याम पाटील, डॉ. चिपळणूकर, डॉ. चुंबे, डॉ. समीर धाकोरकर, डॉ. सुबोध इंगळे, नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तंबाखू नियंत्रण कक्षाच्या वतीने रांगोळी, निबंध, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. नशाबंदी मंडळाच्या वतीने तंबाखू नियंत्रण विभागाच्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘भारतीय संविधान कलम 47’ ची प्रत देऊन सन्मान करण्यात आला. अर्पिता मुंबरकर यांनी तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत व तंबाखूपासून दूर राहण्यासाठीच्या उपाययोजना सांगितल्या. त्यानंतर त्यांनी सर्वांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली. श्री. अल्मेडा यांनीही तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन संदीप मोहोड यांनी केले. आभार प्रदर्शन तृप्ती जाधव यांनी केले. यावेळी नागरिक उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयात जनजागृतीपर कार्यक्रम…
