सुशांत नाईक यांची माहिती ः आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम..
⚡कणकवली ता.०२-: युवासेनाप्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली विधानसभा युवासेनेतर्फे ज्येष्ठ शिवसैनिक व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान पंधरावडा साजरा केला जाणार आहे. ज्येष्ठ शिवसैनिक व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करत त्यांनी दिलेल्या आतापर्यंतच्या योगदानाबद्दल गौरव केला जाणार आहे. शिवसेनावाढी सोबतच समाजातही ज्येष्ठ नागरिकांनी व ज्येष्ठ शिवसैनिकांनी दिलेले योगदान हे महत्त्वपूर्ण आहे. त्याची आठवण यानिमित्ताने केली जाणार असल्याची माहिती शिवसेना उबाठा गटाचे युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली.
खणकवली येथे युवा सेनेची बैठक पार पडली. युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख मुकेश सावंत, कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके, देवगड तालुकाप्रमुख गणेश गावकर, फरीद काझी, वैभववाडी तालुकाप्रमुख रोहित पावसकर, तळेरे शहरप्रमुख आदित्य महाडिक, युवासेनेचे कणकवली तालुका समन्वयक तेजस राणे, संघटक नीतेश भोगले, विभागप्रमुख संतोष सावंत, रोहित राणे, श्री. भोवड यांच्यासह पदाधिकारी व युवासैनिक उपस्थित होते.
आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यशिवाय कणकवली विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक जि. प. मतदार संघनिहाय ज्येष्ठ शिवसैनिक व ज्येष्ठ नागरिक यांचा सन्मान पंधरावडा साजरा करण्याचे ठरविण्यात आले. यानिमित्त शिवसेना उबाठा गटाचे कार्य तळागाळात पोहोचवले जाणार आहे. बैठकीत पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबतही चर्चा करण्यात आली. या निवडणुकीमध्ये शिवसेना उबाठा गटाचे उमेदवाराला मोठ्यामताने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला. या निवडणुकीच्या अनुषंगाने वरिष्ठांनी पदाधिकार्यांना सूचना देत निवडणुकीत गाफील न राहता उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून आणा, असे आवाहन केले.
