धनगर समाजातील दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीचे निमित्त :कै धाऊ बयाजी गोरे ट्रस्टचे आयोजन..

वैभववाडी प्रतिनिधी
कै धाऊ बयाजी गोरे ट्रस्ट धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली व जयंतीच्या निमित्त वैभववाडी तालुक्यातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्री यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी आर डी जंगले, पोलीस निरीक्षक अमोल अवसरमोल, माजी सभापती मीनाताई बोडके, मार्गदर्शक प्राध्यापक गुलदे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र अरुणकर आरडी वडेकर लक्ष्मण शेळके ट्रस्टचे अध्यक्ष संतोष शेळके, गंगाराम आडुळकर अवधूत गुरखे धुळाजी काळे शंकर कोकरे आदी धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता शेळके तर आभार प्रज्ञा गुरखे यांनी मानले.

You cannot copy content of this page