पेंडूर देवळी समाज उन्नती मंडळाने दशावतार कलाकारांचा केलेला सत्कार प्रेरणादायी…

सावळाराम अणावकर ; दशावतार कलेची निर्मिती देवळी समाजापासून..

⚡मालवण ता.२९-: गेली कित्येक वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच गोवा राज्यातही देवळी समाज बांधव दशावतारी कला जोपासत असल्याने ही साऱ्यांना अभिमान वाटावा अशी गोष्ट असून पेंडुर येथील देवळी समाज उन्नती मंडळाने जिल्ह्यातील दशावतारी कलाकारांना सांघिक भावनेने एकत्र करून त्यांचा केलेला सत्कार हा निश्चितच गौरवास्पद आणि कलेच्या क्षेत्रात वावरणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन जिल्हा देवळी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी पेंडुर येथे बोलताना केले

देवळी समाज उन्नती मंडळ, पेंडुर देऊळवाडी आणि सिंधुदुर्ग जिल्हा देवळी समाज उन्नती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने देवळी समाज दशावतार कलाकार सत्कार सोहळा संपन्न झाला. त्यावेळी अणावकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्रीकृष्ण तळवडेकर, रमेश नरसुले, शैलेश पेंडुरकर, रमेश पेंडुरकर, बाबी वेतोरकर, विलास तेंडुलकर, सौरभ पाटकर, राजन नाईक, दिनकर तळवणेकर, अॅड. विवेक मांडकुलकर, रमेश पिंगुळकर, सुधाकर वेंगुर्लेकर, बाळ कनयाळकर, महेश धामापूरकर, सच्चिदानंद कनयाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सावळाराम अणावकर यांनी पूर्वकालीन दशावतार कलेची निर्मिती ही देवळी समाजातूनच झाली आहे.जिल्ह्यातील बहुतेक दशावतारी कंपनीचे मालक हे देवळी समाजातील असून आतापर्यंत त्यांनी आपल्या समाजातील कलाकारांना दशावतारी कलेत मोठा राजाश्रय देऊन समाजाप्रती आदर राखला आहे असेही ते म्हणाले

यावेळी बोलताना जिल्हा सरचिटणीस रमेश पिंगुळकर यांनी जिल्हयातील सर्व दशावतारी कलाकारांना एकत्र करून त्यांचा समाजातर्फे सत्कार सोहळा आयोजित करणे हा उपक्रम पेंडुर येथील युवकांनी राबविल्याबद्दल खरोखरच त्यांची समाजाप्रती असलेली भावना व आदर उल्लेखनीय आहे. अजूनही आपल्या समाजात काही लोकांना मी देवळी आहे, असे सांगायला संकोच वाटतो. त्याचे कारण जिल्ह्यातील काही उपेक्षित राहिलेला समाजबांधव संघटितपणे एकत्र होणे काळाची गरज आहे. याही पुढे पेंडुर येथील युवकांना सिंधुदुर्ग जिल्हा उन्नती मंडळाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन पिंगुळकर यांनी दिले.

यावेळी दशावतारी कलावंत शिवराम वेतोरकर, विलास तेंडुलकर, किसन नेमळेकर, अमित देवळी, उमेश देवळी, संजय वालावलकर, अक्षय पिळणकर, अनिल घावनळकर, प्रथमेश मळगावकर, रवींद्र खानोलकर, दशरथ आकेरकर, संदीप कोनसकर, भाविका खानोलकर, कृष्णा घावनळकर, रोहित नाईक – यांच्यासह खानोलकर, वालावलकर, आजगावकर, मामा मोचेमाडकर, जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ, – सद्गुरू दशावतारी नाट्यमंडळ, माऊली दशावतार नाट्य मंडळाच्या मालकांचा सत्कार करण्यात आला..

यावेळी जिल्ह्यातील देवळी समाजातील सुमारे ८० पेक्षा जास्त – दशावतारी कलाकार व संगीतकार, पखवाजवादक उपस्थित होते. यावेळी त्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्छ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी किशोर पेंडुरकर, अक्षय पेंडुरकर, शेखर फोंडेकर, सत्यवान पेंडुरकर, गजानन पेंडुरकर, कृष्णा पेंडुरकर, नितीन राऊळ यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन सुहास पाटकर यांनी, तर आभार शेखर फोंडेकर यांनी मानले.

You cannot copy content of this page