आंतरजिल्हा बदली शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करा…

शिक्षक समितीची मागणी…

⚡ओरोस ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात २४ मे रोजी ५५६ शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.जिल्ह्याला आंतरजिल्हा बदलीतून काही शिक्षक प्राप्त होणार असून पवित्र पोर्टल मार्फत १० % पदभरतीतून आणखी काही शिक्षक जिल्ह्याला प्राप्त होणार असल्याने आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्ग ने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हयातून अन्य जिल्ह्यात जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या १४७ शिक्षकांची आंतरजिल्हा बदली यापूर्वीच ऑनलाइन स्वरूपात बदली पोर्टलवरून झाली आहे.यातील काही शिक्षकांनी बदली नाकारली असून उर्वरित सुमारे १२५ शिक्षक हे बदलीने आपल्या स्वजिल्ह्यात वा नजीकच्या जिल्ह्यात जाण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.काही जिल्ह्यातही आंतरजिल्हा बदली शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हयात भरतीद्वारे समाधानकारक संख्येने शिक्षक प्राप्त झाल्याने तसेच पुन्हा काही शिक्षक प्राप्त होण्याची शक्यता असल्याने आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना त्वरित कार्यमुक्त करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस व जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page