फरार कारचालकास जामीन मंजूर…

⚡कणकवली ता.२४-: महामार्गावरून चालत असताना अनिल कदम यांना अज्ञात वाहनाने धडक दिली होती. यात अनिल यांचा जागीच मृत्यू झाला होता. हा अपघात शुक्रवार 17 मे रोजी सकाळी 8.30 वा. सुमारास घडला होता. अपघातानंतर धूम ठोकलेल्या कार चालक ओमकार कोरडे याला पाच दिवसांनी कणकवली पोलिसांनी पुणे-निगडी येथील कारसहित ताब्यात घेतले होते. त्यानंतर कुडाळ येथील न्यायालयात कणकवली पोलिसांनी चालकास हजर केले
दोन दिवसांची कोठडी देण्याची मागणी न्यायालयाने केली होती. मात्र, आरोपीचे वकील अक्षय चिंदरकर यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावली. संशयित आरोपी ओमकार कोरडे याला 20 हजार रुपये रकमेच्या सशर्थ जामीनावर मुक्तता केली. साक्षीदारांवर दबाव आणू नये व तपास कामात अडथळा आणू नये, पोलिसांच्या तपास कार्यात सहकार्य करावे, अशा अटींवर न्यायालयाने ओमकार याला जामीन मंजूर केला आहे.

You cannot copy content of this page