अपघातात कारमधील एक महिला जखमी:दोन्ही वाहनांचा दर्शनी भागाचे नुकसान..
⚡कणकवली ता.२४-: खासगी आरम बस व कारमध्ये झालेल्या अपघातात कारमधील एक महिला जखमी झाली. हा अपघात असलदे-डामरेवाडी लगत असलेल्या वळणावर शुक्रवारी सायंकाळी 5.15 वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातग्रस्त महिलेला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात कार व खासगी बसच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले.
देवगडहून मुंबईच्या दिशेने जाणारी खासगी आराम बस (एम एच 1 सी आर 7900) जात होती व सांगलीहून देवगडच्या दिशेने जाणार्या (एम एच 10 बी एम 8034) असलदे-डामरेवाडी येथे आली असता एका वळवणावर दोन्ही वाहनांची एकमेकांना धडक बसली.यात कारमधील एक महिला जखमी झाली. अपघातग्रस्त महिलेला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आहे.अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
