⚡कणकवली ता.२४-: शहरात सिंगल युज प्लास्टिक व संबंधित वस्तू वापरणार्या आस्थापनांवर कणकवली नगरपंचायतीच्या पथकाने शुक्रवारी कारवाई करत 69 किलो प्लास्टिक जप्त करत संबंधित आस्थापनांच्या मालकांवर 25 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली.
ही कारवाई न. पं. मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शना खाली सतीश कांबळे, स्वच्छता निरीक्षक ध्वजा उचले, प्रवीण गायकवाड, सचिन तांबे, राजेश राणे, संदीप मुसळे, सिद्धेश सावंत, गणेश लाड यांच्या पथकाने केले. 5 आस्थापनांवर प्रत्येक 5000 रुपये प्रमाणे 25,000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
कणकवली न. पं. ची 5 आस्थापनांवर दंडात्मक कारवाई…
