विधीवत पूजन ; भक्तगणांनी घेतले दर्शन..
⚡सावंतवाडी ता.२०-: अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांचे आज सकाळी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांचे घरी आगमन झाले. संजू परब यांनी स्वामींच्या पादुकांची विधीवत पूजा अर्चा केली.
स्वामींचे परमशिष्य चोळाप्पा महाराज यांच्या निवासस्थानी स्वामींना समाधी घेतली. या मुळ समाधी स्थानातील ह्या पादुका आहेत. या पादुकांसोबत चोळाप्पा यांचे पाचवे वंशज नितीन प्रभाकर पुजारी हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे अक्कलकोट येथे स्वामींच्या मठात सेवा करणारे स्वामींचे सेवक विजय पुजारी, सुदीप पुजारी, नयन पुजारी, राजू पुजारी, अनिल पुजारी, पुष्कर पुजारी, बसवराज पुजारी, मनोज कोकजे उपस्थित होते. यावेळी संजू परब यांच्या हस्ते विधिवत पादुकांचे पूजन करून आरती व भजन झाले. अनेक लोकांनी यावेळी पादुकांचे दर्शन घेतले.

याप्रसंगी माजी आमदार राजन तेली, माजी नगरसेवक ॲड. परिमल नाईक, हेमंत बांदेकर, दिलीप भालेकर, आनंद नेवगी, मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, मेघना साळगावकर, बंटी पुरोहित, समीर पालव, सत्यवान बांदेकर आजगावकर, बंड्या कोरगावकर आदी उपस्थित होते.

