जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतंत्ररित्या केली निदर्शने*
*💫सिंधुदुर्गनगरी दि.२६-:* देशव्यापी संपात सहभागी होण्यासाठी कामगार कर्मचारी संघटनाच्या कृती समितीच्या आदेशानुसार व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स सीटू महाराष्ट्र राज्य कमिटीच्या निर्णयानुसार गुरुवारी कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीने स्वतंत्र रित्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत राष्ट्रीय संपाला पाठीबा दिला. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांना केंद्र सरकारला देण्यासाठी देण्यात आले. यावेळी सीटू अध्यक्षा अर्चना धुरी, सचिव विजयाराणी पाटील, महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन अध्यक्ष सूर्यकांत नाईक, सचिव मंगेश वरवडेकर, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना अध्यक्ष तन्वी गावडे, सचिव विद्या सावंत, बॉम्बे यूनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स यूनियन कार्यकारी सदस्य विनोदसिंह पाटील, प्रा डॉ शंकर वेल्हाळ आदिंसह असंख्य महिला-पुरुष सहभागी झाले होते. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.