सरकारी, निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटनेच्या देशव्यापी लाक्षणिक संपास सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद

*समितीच्यावतीने मुख्यमंत्री यांना तहसीलदारांमार्फत निवेदन

*💫सावंतवाडी दि.२६-:* आज सरकारी व निमसरकारी कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून एक दिवशीय देशव्यापी लाक्षणिक संप पुकारण्यात आला. जिल्ह्यातील कर्मचारी वर्गाने संपात शंभर टक्के सहभाग दर्शविला. शासनाने याची दखल घेऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्यामार्फत देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष नारायण नाईक, तालुका अध्यक्ष सतीश राऊळ, तालुका सचिव अमोल कोळी, प्रवीण शेर्लेकर, रंगनाथ परब, माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल सावंत, भाऊसाहेब चौरे, शिक्षक परिषद अध्यक्ष प्रवीण सानप चंद्रशेखर सावंत आदी उपस्थित होते. राज्य व देशातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी केंद्र व राज्य स्तरावरील सर्व समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्मचारी वर्गाने आजच्या एक दिवशीय देशव्यापी लाक्षणिक संपात शंभर टक्के सहभाग दर्शविला. शासनाने याची दखल घेऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागण्यांमध्ये १९८२ ची जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी, शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत, केंद्राप्रमाणे वाहतूक भत्ता, शैक्षणिक भत्ता, शहर भत्ता, आपत्कालीन भत्ता व इतर सर्व भत्ते मिळावेत, मुदतपूर्व सेवानिवृत्तीचे जाचक धोरण रद्द करावे, सर्व संवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवावेत , जानेवारी २०१८ पासून महागाई भत्ता व मागील दोन महागाई भत्त्यांच्या हप्त्यांची चौदा महिन्यांची थकबाकी ताबडतोब देण्यात यावी, कमी पटसंख्येच्या नावाखाली स्थानिक स्वराज्य संस्थेची कोणतीच शाळा समायोजित किंवा बंद करू नये आदी विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या

You cannot copy content of this page