आंबोली सैनिक स्कूल ज्ञानदानाचा उत्तम पर्याय…

अत्याधुनिक व गरजेच्या शिक्षण सुविधांची उपलब्धता.

सावंतवाडी ता.१५-:

शहरातील वाढत्या प्रदुषणामुळे शहरी जीवन म्हणजे रोगांना आमंत्रण असे समीकरण आजकाल दृढ होत आहे. अशा बदलत्या जीवनकौशल्यात निसर्गरम्य व शुद्ध स्वच्छ हवा असलेल्या आंबोली येथे आणि ज्ञानदानाचा वसा घेऊन निर्माण झालेली सैनिक स्कूल आंबोली हा निवासी स्कूलसाठी एकमेव उत्तम पर्याय होय.

विविध स्पर्धापरिक्षांचे अचूक मार्गदर्शन :-

सध्याचे युग हे स्पर्धात्मक युग आहे. सैनिक स्कूल मधील विद्यार्थ्यांना या स्पर्धात्मक युगामध्ये सक्षम बनविण्यासाठी विविध राष्ट्रीय, राज्यस्तरीय स्पर्धा परिक्षांना बसण्याची संधी प्रशालेमार्फत देण्यात येते. एन.डी.ए. प्रवेशपरीक्षा ही सैन्याधिकारी होण्यासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धापरीक्षा स्कूलमधील १२ वी सायन्समध्ये अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी सप्टेंबर आणि एच.एस.सी. बोर्ड परीक्षेनंतर एप्रिलमध्ये होणाऱ्या एन.डी.ए. परीक्षेस बसविले जाते.

तसेच इंजिनिअरिंग व मेडिकलशी संबंधित नॅशनल लेव्हलवर घेतल्या जाणाऱ्या IIT JEE AIPMT, AFMC अशा स्पर्धापरीक्षांचे बहुमूल्य मार्गदर्शन केले जाते व या परीक्षांना विद्यार्थ्यांना बसविले जाते. महाराष्ट्र राज्यस्तरावर घेतल्या जाणाऱ्या MHT-CET या परीक्षेस विद्यार्थी प्रविष्ट होतात. या नॅशनल व स्टेट लेव्हलवरील स्पर्धापरीक्षांच्या तयारीमुळे भविष्यकालीन स्पर्धा परीक्षांसाठी मजबूत पायाभरणी होते.

स्पर्धा परीक्षांतील उज्ज्वल यश :-

सिंधुदुर्ग जिल्हा व परिसरातून सैन्याधिकारी निर्माण करणे, एन.डी.ए. आणि समकक्ष राष्ट्रीय राज्य स्पर्धा परिक्षांसाठी युवकांना सक्षम बनविणे हे सैनिक स्कूलचे ध्येय. शाळेच्या पहिल्या बॅचचे गुणवंत विद्यार्थी कॅडेट अनय सावंत, कॅ. प्रथमेश सावंत, कॅ. आदित्य वर्दम यांनी पहिल्याच प्रयत्नांत एन.डी.ए.च्या लेखी प्रवेश परीक्षेत यश संपादन केले. कॅप्टन रोहित शिंदे, कॅप्टन रुद्र खोचरे हे सैन्यसेवेत रूजू आहेत तर लेफ्टनंट आकाश लाड हा प्रशिक्षण घेऊन लवकरच सेवेत दाखल होणार आहे. या सैनिक स्कूलच्या कॅडेट्सचा सर्वांना सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्र राज्याच्या गुणवत्ता यादीत कोकणाने आपला अव्वल दर्जा कायम राखला आहे. याच गुणवत्तेला पैलू पाडून सैन्यसेवेत अधिकारी म्हणून रूजू होण्यासाठी दर्जेदार शैक्षणिक मार्गदर्शन व खडतर सैन्य प्रशिक्षण देण्याचं कार्य सैनिक स्कूल करत आहे. शै. वर्ष २०१३-१४ मध्ये कॅ. प्रतिक गावडे, शै. वर्ष २०१४-१५ मध्ये कॅ. मधुसुदन लाड, कॅ. साहिल वालीकर, कॅ. अनिकेत सावंत या विद्यार्थ्यांनी एन.डी.ए. लेखी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. भविष्यकाळात निश्चितच भारतीय सैन्यदलामध्ये उच्चपदस्थ अधिकारीपदावर सैनिक स्कूलचे माजी विद्यार्थी असतील, असा सर्वाना आशावाद आहे.

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरीता इ. ६ वी व इ.११ वी (सायन्य) रिक्त जागांसाठी शाळेची प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली असून इच्छुक पालकांनी सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली फोन नं. ०९४२०१९५५१८, ०७८२२९४२०८१ येथे संपर्क साधावा असे आवाहन संस्थाध्यक्ष व शाळेच्या प्राचार्यांनी केले आहे.

You cannot copy content of this page