पैसे वाटपाच्या व्हिडिओ सहित दिला पुरावा..
⚡कणकवली ता.१५-: रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे, अशी तक्रार मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे. मतदारांना लाच देणे, मतदारांना धमकावणे, मतदारांना पैशांचे वाटप करण्याचे व्हिडीओ उपरकर यांनी फॉरवर्ड आयुक्तांना केले आहेत. एका व्हिडीअोत तर भाजपचे कार्यकर्ता खुलेआम पैसे देताना दिसत आहेत. याशिवाय उमेदवार नारायण राणे आणि ईव्हीएम मशिनवर कोणत्या चिन्हावर मतदान करायचे तेही त्याने दाखवले आहे. व्हिडिओनुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी उपरकर यांनी केली आहे.
