विजय गुरव यांची माहिती
*💫कुडाळ दि.२७-:* रत्नागिरी-सिंधुदूर्ग साह्यक कामगार आयुक्त पदी व सिंधुदूर्ग कामगार अधिकारी पदावर नियमित अधिकारी नेमा, या मागण्यांसाठी लवकरच या महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समिती मा. कामगार मंत्री दिलीप वळसे- पाटील व कामगार राज्य मंत्री मा. बच्चू कडू यांची पुढील आठवड्यात भेट घेणार, अशी माहिती अध्यक्ष विजय गुरव यांनी दिली. सध्या रत्नागिरी-सिंधुदूर्ग जिल्हा साह्यक कामगार आयुक्त पदी सांगली जिल्ह्याचे साह्यक कामगार आयुक्त यांच्या जवळ प्रभारी पदभार दिलेला आहे. ते रत्नागिरी येथे आठवड्यातून दोन दिवस हजर असतात. साह्यक कामगार आयुक्त हे पद रत्नागिरी सिंधुदूर्ग या दोन जिल्ह्यासाठीचे असल्याने आठवड्यातुन दोन दिवसाचा कालावधी हा खूप कमी आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षक तसेच इतर कामगारांना त्यांच्या कामासाठी फेऱ्या मारुनही काम होत नाही. साह्यक कामगार आयुक्त हे रत्नागिरी-सिंधुदूर्ग जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष असून ते प्रभारी पदावर सध्या काम करत असल्याने त्यांना सुरक्षा रक्षकांना पुरेसा वेळ देता येत नाही. त्यामुळे कितेक सुरक्षा रक्षकांचे प्रश्न प्रलंबीत राहीले आहेत. साह्यक कामगार आयुक्त तथा सुरक्षा रक्षक मंडळ अध्यक्ष यांचे लक्ष आंदोलन करुन दोन महिन्यापूर्वी राज्य सुरक्षा रक्षक एकता समितीने वेधूनही त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंडळाच्या अध्यक्षाना वेळ मिळाला नाही. रत्नागिरी-सिंधुदूर्ग या जिल्ह्यांना ई एसआय सुविधा नसते वेळीही मंडळाने चुकीच्या पद्धतीने सुरक्षा रक्षकांच्या लेव्हीतुन ईएसआय कट केला जातो. ईएसआय स्वरूपात कोटीच्या घरात पैसे जमा असून सुरक्षा रक्षकांना त्याचा फायदा होत नाही. वेळे अभावी साह्यक कामगार आयुक्त सुरक्षा रक्षकांना न्याय देत नाहीत. त्याचा फटका अपघाताने अंथरुणाला खिळलेल्या सुरक्षा रक्षकाला भोगावा लागत आहे. अशा कितेक प्रश्नांना साह्यक कामगार आयुक्त वेळे अभावी न्याय देवू शक्त नाहीत. तसेच सिंधुदूर्ग कामगार अधिकारी प्रभारी पदी पनवेल येथील कामगार अधिकारी यांची नेमणूक केली आहे. ते पंधरा दिवसांनी दोन दिवस सिंधुदूर्ग मध्ये हजर असतात. त्यामुळे या ठिकाणी इमारत बांधकाम कामगार यांची अॅानलाईन दोन दोन महिन्यांपूर्वी नोंदणी केलेली असूनही ओळख पत्र वेळीच मिळत नाही. तसेच सुरक्षा रक्षक व इत्तर कामगार यांचे पण प्रश्न मार्गी लागत नाही वरील गोष्टी ह्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समिती मा. कामगार मंत्री दिलीप वळसे- पाटील व कामगार राज्य मंत्री मा. बच्चु कडू यांच्या निदर्शनास पुढील आठवड्यात आणून देणार आहे.
