भडगाव खुर्द येथील श्री देव रवळनाथ मंदिर वर्धापन दिन सोहळा…

⚡कुडाळ ता.१३-:
कुडाळ तालुक्यातील भडगाव खुर्द येथील श्री देव रवळनाथ मंदिर वर्धापन दिन सोहळा व श्री देव गिरोबा मायंदेश्वर मंदिर नूतन सभा मंडपाचा उद्घाटन सोहळा १६, १८ मे २०२४ रोजी होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री देव गिरोबा मायंदेश्वर मंदिर कार्यक्रम १६ रोजी सकाळी १० वाजता लघुरुद्र, अभिषेक, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता सत्यनारायण महापूजा, ६ वाजता आरती व तीर्थप्रसाद, ७ वाजता हरीपाठ, स्थानिक मंडळांची भजने, महाप्रसाद रात्री १० वाजता श्री पावणाई लोककला दशावतार मंडळ ( हरकुळ खुर्द) चे नाटक, १८ रोजी श्री देव रवळनाथ मंदिर कार्यक्रम सकाळी १० वाजता लघुरुद्र, अभिषेक,दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता सत्यनारायण महापूजा,सायंकाळी ६ वाजता महाआरती, तीर्थप्रसाद, सायंकाळी ७ वाजता हरीपाठ, स्थानिक मंडळांची भजने, महाप्रसाद, रात्री ९ वाजता सद्‌गुरु संगीत मंडळ ( कुडाळ बुवा- वैभव सावंत) व श्री कोटेश्वर मंडळ (हरकुळ बुद्रुक बुवा- सुजित परब) यांच्यात डबलबारी सामना होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन भडगांव खुर्द ग्रामस्थांनी केले आहे.

You cannot copy content of this page