संत शिरोमणी गोरोबाकाका पुण्यतिथी निमित्त आयोजन..
वैभववाडी प्रतिनिधी
कोकिसरे कुंभार समाज मंडळाच्या वतीने श्री संत शिरोमणी गोरोबाकाका पुण्यतिथी सोहळानिमित्त शनिवार दिनांक 4 मे 2024 ते मंगळवार दिनांक 7 मे 2024 या दरम्यान धार्मिक, संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील नामवंत प्रवचनकार व कीर्तनकर प्रबोधन करणार आहेत.
चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये दररोज पहाटे काकड आरती, नित्य पूजा पाठ, अभिषेक करण्यात येणार आहे.4 मे रोजी, सकाळी 8 तीस ते 10 वाजता श्री सिद्धेश्वर मंदिर शिव पिंडीवर अभिषेक, सकाळी 10 ते 12:30 विष्णू पंचायतन हवन, दुपारी 12.45 ते 1 महाआरती, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी 4 ते 6 वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ. यावेळी श्री संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नारायण साळवी उपस्थित राहणार आहेत. तर सायंकाळी साडेसहा ते आठ सुप्रसिद्ध कीर्तनकार श्री विश्वास भोसले महाराज पनवेल यांचे आध्यात्मिक किर्तन होणार आहे. तर रात्रौ महाप्रसाद, त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तर 5 मे रोजी सकाळी 9 ते 11 सत्यनारायण महापूजा, सायंकाळी 4 ते 6 वा.महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी 6 ते 7 वा. ह भ. प. श्री.कृष्णा माळकर महाराज मुंबई यांचे कीर्तन होणार आहे. तर रात्रौ बुवा विजय गंडू सावंत व बुवा संदीप पुजारे यांच्यामध्ये ट्वेंटी-ट्वेंटी डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे. सोमवार दिनांक 6 रोजी दिंडी सोहळा, महाप्रसाद व रात्रौ 9 ते ते 10.30 वा.ह भ प रघुनाथ महाराज तेरसे यांचे किर्तन होणार आहे. त्यानंतर दिंडी भजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्यावतीने अध्यक्ष अरविंद जांभवडेकर सचिव राजकुमार खेडेकर यांनी केले आहे.
