राणेसमर्थक संतोष गावस यांचे आवाहन
⚡सावंतवाडी ता.०३-: कोकणचे भाग्यविधाते, महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मतदान करण्याची कोकणवासीयांना बहुदा सावंतवाडी मतदारसंघाला पहिल्यांदाच सुवर्णसंधी चालून आली आहे.
त्यामुळे खासदार म्हणून त्यांना लोकसभेत पाठवू या, भरघोस मतांनी त्यांना विजयी करून आलेल्या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा. तसेच विरोधी गटातील राणेप्रेमी चाहत्यांनी नारायण राणेंना मतदान करावं असं आवाहन राणेसमर्थक संतोष गांवस यांनी करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भरघोस मतांनी विजयी कराव असं सांगितलं.
