मालडी येथील भावई मंदिराचा जीर्णोद्धार वर्धापन दिन १३ रोजी…

⚡मालवण ता.०३-:
मालडी येथील श्री भावई देवी मंदिर जीर्णोद्धार ३० वा वर्धापन दिन सोहळा १३ मे रोजी विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. श्री भावई देवी मंदिर धाकटी मालडी येथे हा कार्यक्रम होणार आहे.

यानिमित्त सकाळी ८.३० वाजता देवीचा अभिषेक, सकाळी ९.३० वाजता महाआरती, सकाळी १०.३० वाजता देवीची ओटी भरण्यास प्रारंभ, दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ ते ८ या वेळेमध्ये स्थानिक मंडळांचे सूस्वर भजन, रात्री ८.३० वाजता स्थानिक कलाकारांची अदाकारी ने नटलेला मालडीची लोकधारा हा कार्यक्रम सादर केला जाईल. या धार्मिक सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन मालडी ग्रामस्थ व मालडी ग्रामोत्कर्षक मंडळ मुंबई यांनी केले आहे.

You cannot copy content of this page