⚡कणकवली ता.०३-: महाराष्ट्र दिनाचे आैचित्यसाधून खारेपाटण ग्रा. पं. तर्फे कर्मचारी वर्गाचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सरपंच प्राची ईसवलकर, उपसरपंच महेंद्र गुरव, ग्रा. पं. सदस्य गुरुप्रसाद शिंदे, किरण कर्ले, जयदीप देसाई,सुधाकर ढेकणे, मानली होनाळे, दक्षता सुतार, ग्रामविकास अधिकारी जी. एस. वेंगुर्लेकर, देवानंद ईसवलकर आदी उपस्थित होते. आरंभी ग्रा. पं. कर्मचारी अजय तेली यांना ध्वजारोहणाचा मान दिला. त्यानंतर संदेश पाटणकर यांचा जयदीप देसाई यांनी तर अजय तेली यांचा प्राची ईसवलकर यांनी सन्मान केला. महाराष्ट्र दिनाच्या ग्रामस्थांना प्राची ईसवलकर यांनी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन जी. सी. वेंगुर्लेकर यांनी केले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.
खारेपाटण ग्रा. पं. कर्मचाऱ्यांचा सन्मान…
