महाविकास आघाडीचे नेते टीका करायची म्हणून मोदींना टार्गेट करत आहेत…

देश महासत्ता बनण्यासाठी मोदींना साथ देणे गरजेचे आहे:देवगड येथील प्रचार सभेत नारायण राणे यांचे आवाहन..

देवगड)(प्रतिनिधी)
देश महासत्ता होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सज्ज झाला असून. २०३० सालामध्ये भारत देश ही जगातील तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून जन्माला येईल. असे असताना केवळ टीका करायची म्हणूनच महाविकास नेते मोदींवर टीका करत आहेत. उद्धव ठाकरे यांना कोकणाबद्दल अजिबात प्रेम नसून आकस आहे अशी घनाघाती टीका केंद्रीय मंत्री व महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी देवगड तालुक्यातील संवाद मेळाव्यात बोलताना केले.


महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जिल्हा परिषद गटानुसार संवाद मेळावा आयोजन कुणकेश्वर जिल्हा परिषद गट मिठबाव येथे तर किंजवडे जिल्हा परिषद मतदार संघ इळये येथे पार पडला..
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठवली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडले
या सभामध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर मिठबावं येथील सरपंच भाई नरे, प्रकाश राणे, देवगड अर्बन बँकेचे अध्यक्ष सदाशिव ओगले, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश बोडस, मनस्वी घारे ,सावी लोके मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष मयेकर, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अमोल लोके, बापू धुरी यांच्यासह अन्य उपस्थित होते
कोकणच्या विकासासाठी खूप काम केले केंद्रीय मंत्री असताना विकासासाठी अनेक कामे केली आहेत या ठळक कामांमध्ये २०० कोटीचे ट्रेनिंग सेंटर ७० उदबत्ती मशीनस यासह अनेक गोष्टी केल्या आहेत
मात्र उद्धव ठाकरे आणि विनायक राऊत यांनी चिरीमिरी साठी व कमिशन साठी विरोध केला या पलीकडे कोकणसाठी काहीही केलेले नाही. जैतापूर अणू प्रकल्पाला विरोध म्हणून पाच कोटीची लाच घेतली असा गौप्य स्फोटही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला.
विमानतळाच्या भूसंपादनाला विरोध करणारे ज्यावेळी विमानतळाच्या उद्घाटनाला येतात त्यावेळी ही मंडळी कशी आहेत याचा प्रत्यय येतो असेही नारायण राणे यांनी आपल्या भाषणात म्हटले. कोरोनातही औषधात १५ टक्के टक्केवारी उद्धव ठाकरे यांनी खाल्ली याची चौकशी अद्याप सुरू आहे. केवळ शिव्या घालणे या व्यतिरिक्त कोणतीही भूमिका उद्धव ठाकरे मांडत नाहीत असेही नारायण राणे यांनी आपल्या भाषणातून नमूद केले
गेलेदहा वर्षात एकही काम न करणारा खासदार विनायक राऊत आमदार नितेश राणे यांची घणाघाती टीका
आमदार नितेश राणे यांनी यावेळी बोलताना विनायक राऊत यांच्या कार्यपद्धतीवर घणाघाती टीका केली. कोणतेही दहा वर्षात काम न करणारा लोकांना तोंड न दाखवणारा खासदार आपल्या भागाला लाभला याचे वाईट वाटते.
जिल्ह्याच्या बीएसएनएल कमिटीचा खासदार अध्यक्ष असतो. मात्र विनायक राऊत यांनी आजपर्यंत बीएसएनएलच्या नेटवर्क बाबत कोणतेही काम केलेले नाही. केवळ थापाबाजी करणे व उद्घाटन करणे. या पलीकडे त्यांनी काहीही केलेले नाही. ज्या बीएसएनएल टॉवरचा त्यांनी शुभारंभ केला अशा टॉवर ना नेटवर्क असल्याचे दाखवावे असे आव्हानही त्यांनी दिले.
सिडकोच्या बाबत सतत अपप्रचार करण्याची भूमिका खासदार विनायक राऊत यांनी घेतली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे कोकणात आपणासाठी कार्यरत असताना कोकणकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कोणाची नाही.
हे सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे सिडकोचा आदेश केव्हाच रद्द झाला. आम्ही कोकणचे कधीही वाईट होऊ देणार नाही. माझ्या मतदारसंघातील प्रत्येक वाडीत विकास काम झाले आहे यामुळे शंभर टक्के मतदान महायुतीच्याच उमेदवाराला झाले पाहिजे. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली या सभांमध्ये माजी आमदार अजित गोगटे, सदाशिव ओगले, यांनी आपले विचार व्यक्त केले

You cannot copy content of this page