Headlines

हरकुळ बु. येथे 10 रोजी मे रोजी विविध कार्यक्रम…

⚡कणकवली ता.०२-: हरकुळ बुद्रुक-जंगमवाडी येथील श्री जंगमेश्‍वर सेवा मंडळातर्फे शुक्रवार 10 मे रोजी जंगमेश्‍वरपार याठिकाणी विविध कार्यक्रम व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.


सकाळी 8 वा. आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले असून या शिबिराचे उद्घाटन डॉ. अनंत नागवेकर यांच्या हस्ते होईल. शिबिरात डॉ. बी. एस. म्हाडेश्‍वर, डॉ. शमिता सावंत-बिरमोळे या तपासणी करणार आहेत. 9 वा. पारपूजन, अभिषेक, 11 वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, 1 वा. महाप्रसाद, 3 वा. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी 4 वा. महिलांसाठी होम मिनिस्टर, पैठणीचा खेळ, संगीत खुर्ची स्पर्धा, 6 वा. लहान मुलांसाठी क्रीडा स्पर्धा, 7 वा. स्थानिक भजनी कलाकारांचे भजन, रात्री 8 वा. श्री रामेश्‍वर प्रा. भजन मंडळ, भिरवंडे यांचे बुवा सतीश सावंत यांचे भजन, 9 वा. स्वागत समारंभ व पारितोषिक वितरण, 10 वा. श्री विघ्नहर्ता रामेश्‍वर दशावतार नाट्यमंडळ, निगुडे यांचा ‘शिव अघोरी संग्राम’ हा प्रयोग सादर होईल. तरी सर्वांचा कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

You cannot copy content of this page