ठाकरेंच्या सभा स्थळाची आमदार वैभव नाईकांनी केली पाहणी…

⚡कणकवली ता.०२-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविअा व इंडिया अाघाडीचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा शुक्रवारी 3 मे रोजी सायंकाळी 6 वा. येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर होणार अाहे.

या स्थळाची अामदार वैभव नाईक यांनी पाहणी करत सभेच्या नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, उपजिल्हाप्रमुख संदीप कदम, संकेत नाईक आदी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या या प्रचारसभेची जय्यत तयारी सुरू असून इंडिया-महाविकासचे आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि जिल्हावासीयांनी ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आम. वैभव नाईक यांनी केले आहे.

You cannot copy content of this page