कोकणच्या विकासासाठी राणेंना मतदान करावे…

माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांचे आवाहन ः कुंभवडे, नरडवे गावात राणेंचा प्रचार..

⚡कणकवली ता.०२-: कोकणचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता भाजप व केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यात आहे. मतदारांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना मतदान करावे, असे आवाहन माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी कुंभवडे व नरडवे गावातील मतदारांना केले.
महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा कुंभवडे गावातील प्रचाराचा शुभारंभ भाजपच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्री देव महालिंगेश्‍वर चरणी श्रीफळ अर्पण करून केला. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संजना सावंत, माजी सरपंच सुशांत सावंत, श्रीराम सावंत, दतप्रसाद गांवकर, सत्यवान सदडेकर, आदित्य सावंत, मंगेश शितप, कृष्णा गांवकर, भागेश सावंत, गणेश बिडये, चंदू मेस्त्री, अपराज बांदेकर, सुधीर सावंत, चंद्रकांत लाड, विजय भोगटे यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. नारायण राणे हे मोठ्या मताधिक्यांनी निवडून ये देऊ, असे गार्‍हाणे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्री देव महालिंगेश्‍वर चरणी घातली. प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर संजना सावंत व भाजपच्या कार्यकर्त्यांनी कुंभवडे गावातील मतदारांच्या गाठीभेटी घेत राणेंना मतदान करण्याचे आवाहन केले.
महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ संजना सावंत यांनी नरडवे मतदारसंघात महिला मतदारांच्या गाठीभेट घेत त्यांचा समस्या जाणून घेतल्या. राणेंना विजय करण्यासाठी मतदान करा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. यावेळी माजी सभापती सुरेश ढवळ, सरपंच बाबू सावंत, उपसरपंच वैभव नार्वेकर ग्रा. पं. सदस्य श्री. साटम, माजी ग्रा. पं. सदस्य प्रकाश सावंत यांच्यासह नरवडे-घोलानवाडीतील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page