खारेपाटणमध्ये विनायक राऊत यांचा घरोघरी प्रचार…

⚡कणकवली ता.०२-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांचा खारेपाटण विभागातील खारेपाटण, शिडवणे, कुरंगवणे गावांमध्ये मविआतील घटक पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचार करण्यात सुरुवात केली आहे.


प्रचारामध्ये शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, उपतालुकाप्रमुख महेश कोळसुलकर, माजी विभागप्रमुख दया कुडतरकर यांच्यासह मविआचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन विनायक राऊत यांची निशाणी मशाल त्यांच्यापर्यंत पोहोचवली.

You cannot copy content of this page