विशाल परब ; कळणे येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले आवाहन..
दोडामार्ग ता.०२-:भविष्यात विकास साध्य करायचा असेल तर तळागाळातून काम करणे गरजेचे त्यामुळे आगामी निवडणुकीत नारायण राणे यांना निवडून देण्यासाठी काम करा भविष्यात आम्ही नेहमी तुमच्या पाठीमागे उभे राहू असे आवाहन युवा उद्योजक भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी दोडामार्ग कळणे येथे आयोजित बैठकीत केले.
यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, अॅड. अनिल निरवडेकर, कळणे सरपंच अजित देसाई, भिकाजी देसाई उपस्थित होते.
