⚡कणकवली ता.०१-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वायंगणी गावातील प्रचाराचा शुभारंभ श्री आदिनाथ मंदिरात भाजपच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.
यावेळी माजी जि. प. सदस्य बाळा जठार, भाजप शक्तीकेंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर, रमाकांत राऊत, बूथ अध्यक्ष कृष्ण बाणे, वायंगणीचे उपसरपंच प्रताप फाटक, संदीप सावंत, प्रमोद जाधव, संदीप दळवी, प्रकाश बाणे, अशोक फाटक, प्रदीप फाटक, प्रकाश गुरव, एकनाथ बाणे, बाबू कदम आदी उपस्थित होते. राणेंना वायंगणी गावातून मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला.
वायंगणी येथे राणेंच्या प्रचाराचा शुभारंभ…
