नारायण राणेंच्या प्रचारार्थ सावंतवाडीत उद्या महायुतीच्या वतीने बाॅईक रॅलीच आयोजन…

दिपक केसकर व निलेश राणे यांची उपस्थिती: सर्वांनी उपस्थित राहण्याचे संजू परब ,अजय गोंदावळे,बाबू कुडतरकर यांचे आवाहन..

सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी शहरात उद्या सायंकाळी ५ वाजता महायुतीच्या प्रचार रॅलीच आयोजन करण्यात आलं आहे.या रॅलीचा शुभारंभ महायुतीच्या प्रचार कार्यालयातून मंत्री दीपक केसरकर व माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली.

दरम्यान या रॅलीमध्ये एक हजाराहून अधिक महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी होतील व त्यानंतर माजी खासदार निलेश राणे हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधणार आहेत तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहान संजू परब, अजय गोंदावळे, बाबू कुडतरकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page