ग्रामीण भागासह शहरातून सर्वाधिक लीड हे राणेंच्या मागे…

अशोक दळवी: दीपक केसरकर यांच्या विकास कामांची पोचपावती राणेंना मताधिक्यातून मिळणार..

⚡सावंतवाडी ता.०१-: मतदारसंघात मोठा पाठिंबा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मिळत आहे. पाचही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकदिलाने कार्यरत आहेत. ग्रामीण भागासह शहरातून सर्वाधिक लीड हे राणेंच्या मागे असेल. असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी आज इतर व्यक्त केले.दरम्यान

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांमुळे म्हणून जनता आमच्यासोबत राहील. त्याची पोचपावती राणेंना मिळणाऱ्या मताधिक्यातून असेल असं मत व्यक्त केले.

You cannot copy content of this page