कलमठमध्ये राणेंचा घरोघरी प्रचार…

⚡कणकवली ता.०१-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या कलमठ विभागातील प्रचारार्थ भाजपच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी कलमठ बाजारपेठ येथे प्रचारफेरी काढली. या फेरीदरम्यान, कार्यकर्त्यांनी घरोघरी पत्रके वाटली.


या फेरीत युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा सरपंच संदीप मेस्त्री, जिल्हा बँकेच्या संचालिका प्रज्ञा ढवण, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, माजी पंचायत समिती सदस्य महेश लाड, ग्रा. पं. सदस्य नितीन पवार, सुप्रिया मेस्त्री, स्वाती नारकर, श्रेयस चिंदरकर, दिनेश गोठणकर, बूथ अध्यक्ष आबा कोरगावकर, नितीन पटेल, विनिता बुचडे, मिलिंद चिंदरकर, संतोष रेवंडकर, प्रवीण सावंत, बाबू काणेकर, स्वरूप कोरगावकर, शेखर पेंधूरकर, समर्थ कोरगावकर, समीर रजपूत, प्रिती सावंत, प्रसाद बुचडे, बन्सी माळवदे, श्रद्धा हजारे, गौरी साळकर, तेजस लोकरे, सत्येंद्र जाधव, सुरेश सावंत, प्रदीप कांबळी, विराज गुडेकर, प्रदीप ढवण, सुदेश देसाई, पंढरीनाथ दळवी, एकनाथ वायंगणकर, दिनार लाड, गोविंद साळकर, शिवम धानजी, परेश कांबळी, प्रथमेश धुमाळे हे सहभागी झाले होते. यावेळी ‘भारतीय जनता पार्टी विजय असो’, ‘नारायण राणे तुम्ह आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘अबकी बार चारसो पार’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.

You cannot copy content of this page