कणकवली ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या नडगिवे गावातील प्रचाराचा शुभारंभ श्री गांगेश्वर मंदिरात भाजपच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.
यावेळी माजी जि. प. सदस्य बाळा जठार, शरद कर्ले, शक्ती केंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर, माजी प. स. सदस्य तृप्ती माळवदे, नडगिव सरपंच माधवी मण्यार, उपसरपंच भूषण कांबळे, माजी सरपंच अमित मांजरेकर, माजी उपसरपंच भावेग कर्ले, बूथ कमिती अध्यक्ष अरुण कर्ले, ग्रा. पं. सदस्य लता हिवाळकर, दर्शना गुंडये, मयुरी कर्ले, प्रशांत धावडे, सुधीर सुतार, चंद्रकांत मण्यार, सचिन गुरव, श्रीधर मण्यार, विनायक मण्यार, यश पाटील, दुर्वेश आंबेरकर, नयन ठुल, दिलीप मण्यार, सुधीर सुतार, अमित सावंत, बाबल्या जाधव, प्रवीण मण्यार यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. नडगिवे गावातून राणेंना मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला.
नडगिवे येथे राणेंच्या प्रचाराचा शुभारंभ…
