नारायण राणेंच्या पराजयची हॅट्रिक करूया…

फोंडाघाट येथील सभेत खा. विनायक राऊत यांचे आवाहन..

⚡कणकवली ता.२५-: विनायक राऊत यांनी मागील 10 वर्षांत काय केले असे मला राणे पित्रा-पुत्र विचारत अाहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना कोकणाच्या विकासासाठी कोट्यवधीचा निधी दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मेडिकल काॅलेज मंजूर केले. मागील 10 वर्षांत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात्मक कामासाठी मी माझा खासदार निधी 100 टक्के खर्च केला आहे. राणेंनी स्वतःच्या मेडिकल काॅलेजला फायदा होण्यासाठी लॅब सोलापुरला नेली. त्यामुळे स्वार्थी वृत्तीच्या नारायण राणेंच्या पराजयची हॅट्रिक करूया, असे आवाहन त्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांनी केले.
कनेडी येथे योजित महाविकास आघाडीाया प्राचारसभेत श्री. राऊत बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, संजय घाडी, संजना घाडी, रत्नागिरी जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, उपनेते गौरीशंकर खोत, विधानसभाप्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हाणेकर, संदीप कदम, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम पालव, हरकुळ बु.चे सरपंच बंडू ठाकूर, तालुकाप्रमुख डाॅ. प्रथमेश सावंत, उत्तम लोके, आनंद आचरेकर, मुकेश सावंत, बेनी डिसोझा, भरत गावकर आदी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे मुख्यामंत्री असताना आम्ही सिंधुदुर्गासाठी शासकीय मेडिकल कॉलेज आणले तसेच कॅथ लॅब मंजूर केली होती. पण स्वतःच्या मेडिकल कॉलेजला फायदा होण्यासाठी राणेंनी लॅब सोलापूरला नेली. आता आम्हाला विचारतायत की विनायक राऊत यांनी 10 वर्षांत काय केले? एमआरसीला विरोध आणि संविधान वाचविण्यासाठी आपल्या विजयाची तर नारायण राणेंच्या पराजयची हॅट्रिक करूया, असे आवाहन राऊत यांनी केले. यावेळी राजेंद्र महाडिक, सुशांत नाईक, गौरीशंकर खोत, संजय घाडी, अतुल रावराणे, संदीप कदम यांनीही विनायक राऊत यांना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले.

You cannot copy content of this page