दिपक केसरकर ; एक विहीर बांधून मत मागता येत नाही, राऊतांना टोला..
⚡सावंवाडी ता.२५-: कोकणाचा विकास नारायण राणेच करू शकतात. त्यामुळे राणेंच्या पाठशी उभे राहून त्यांना प्रचंड मतानी निवडून आणून त्यांना केंद्रात पाठवूया असे प्रतिपादन मंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे केले. दरम्यान विनायक राऊत १० वर्ष खासदार होते. त्यांनी सिंदुधर्गसाठी काय केले ? फक्त एक विहीर बाधून मत मागीतले जात नाही. जनतेने आता राऊत यांना ओळखले आहे. लोकसभा निवडणुकीत जनता त्यांना बरोबर जागा दाखवणार, अशी टिका देखील त्यांनी यावेळी केली.
श्री.केसरकर माडखोल येथे आयोजित करण्यात आलेल्या जन संपर्क यात्रा सभेत बोलत होते. यावेळी केसरकर पुढे बोलताना म्हणाले की पुढच्या वर्षी काजू हे सरकार खरेदी करणार आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे असून येणाऱ्या काळात समृद्धी येण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असेही केसरकर यांनी यावेळी सांगितले.