खा. विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी पक्षाच्या कुडाळ तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न…

⚡कुडाळ ता.२५-: शिवसेना-इंडिया- महाविकास आघाडीचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुडाळ तालुका कार्यकारिणीची बैठक आज कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे संपन्न झाली. या बैठकीला आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, प्रसाद रेगे, कुडाळ शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक, बाळ कन्याळकर, भास्कर परब, घोगळे, आत्माराम ओटवणेकर, आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page