राजन कोरगावकर यांचा इशारा ः कणकवलीत राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा सन्मान सोहळा..
कणकवली ः नवीन संचमान्यतेचे निकष गोरगरिबांच्या मुलांचे भवितव्य अंधकारमय करणारे, शिक्षणापासून दूर ठेवणारे आहेत. शिक्षक समिती या विरोधात राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार इशारा राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी समितीतर्फे कणकवली येथे आयोजित केलेल्या दत्तक विद्यार्थी, गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळ्यात बोलताना दिला.
समितीच्या कणकवली शाखेचे उपक्रम कौतुकास्पद आहेत. तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर व महिला आघाडी अध्यक्षा नेहा मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारिणीचे काम चांगले आहे, असे कौतुकोद्गार कोरगावकर यांनी काढले.
या सोहळ्याचे उद्घाटन श्री. कोरगावकर यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात कणकवली तालुक्यातील २२ केंद्रातील २२ गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी दीड हजार रुपये किंमतीचे शैक्षणिक साहित्य मान्यवरांचे हस्ते मोफत वितरण करण्यात आले. इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या १३ विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व शैक्षणिक साहित्य देऊन संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच ए. पी. जे. अब्दुल कलाम परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या इयत्ता ४ थी तील ३ विद्यार्थ्यांचा व इयत्ता ७ वी तील ३ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात कणकवली तालुक्यातून नवोदय परीक्षेत निवड झालेल्या ५ विद्यार्थ्यांचा सन्मान शैक्षणिक साहित्य देऊन करण्यात आला. शिक्षक समिती सिंधुदुर्ग आयोजीत मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षेत कणकवली तालुक्यातून १ ते १० क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांनाही यावेळी शैक्षणिक साहित्य व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
जिल्हास्तरीय ज्ञानी मी होणार महोत्सवात प्रथम आलेल्या हरकुळ खुर्द गावडेवाडी शाळेच्या अर्णव राजाराम भिसे व संचित समीर सावंत या विद्यार्थ्यांचाही शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला. तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या कणकवली तालुक्यातील सुशांत मर्गज, ऋतुजा चव्हाण, विद्याधर पाटील यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच कणकवली तललुक्यातील या वर्षभरात सेवानिवृत्त झालेल्या व संघटनेचे सभासद असलेल्या सेवानिवृत शिक्षक सुजाता टिकले, शर्मिला कदम, शुभलक्ष्मी कुलकर्णी, प्रियांका सावंत, सुनिता मुसळे, श्रद्धा हजारे, अरुण पंडित, श्रीकृष्ण बोभाटे, रेशमा दांडेकर शुभांगी सावंत सुजाता साटविलकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम व तालुक्यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या शाळा व परसबाग उपक्रमांतर्गत कणकवली तालुक्यातील जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त शाळेचा सत्कार शाल व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.
कणकवली महिला आघाडी अध्यक्षा नेहा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, जिल्हासचिव तुषार आरोसकर, राज्य कार्यकारिणी सदस्य दादा जांभवडेकर, ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत अणावकर, भाई चव्हाण, शिक्षक नेत्या सुरेखा कदम, उपाध्यक्ष रूपेश गरुड, धीरज हुंबे, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष कुडाळकर, माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे, माजी जिल्हासचिव सचिन मदने, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष निकिता ठाकुर, सचिव वैभवी कसालकर, शिक्षक पतपेढी अध्यक्ष नारायण नाईक, संचालक संतोष मोरे, मंगेश कांबळी, चंद्रसेन पाताडे, विजय सावंत, श्रीकृष्ण कांबळी, ऋतुजा जंगले, महेंद्र पावसकर, कुडाळ अध्यक्ष शशांक आटक, मालवण अध्यक्ष राजेंद्रप्रसाद गाड, वैभववाडी अध्यक्ष रफिक बोबडे, देवगड अध्यक्ष जयेन्द्र चव्हाण, प्रशांत झालबा, जीवन हजारे, महादेव शेट्ये, महेश काळे, विनीता शिरसाट आदि पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुशांत मर्गज व रश्मी आंगणे यांनी केले. आभार अजय तांबे यांनी मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. दत्तक विद्यार्थी कार्यक्रम समितीप्रमुख संतोष कुडाळकर आणि उपप्रमुख अजय तांबे आणि संपूर्ण टीमने अहोरात्र मेहनत घेऊन संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.