दिपक केसरकर; दहा वर्षात विकास न करणारे भावनिक आवाहनावर मते मागतात..
⚡सावंतवाडी ता.२५-: आपल्याला एकत्र काम करायचा आहे त्यामुळे हेवेदावे बाजूला ठेवून राणेसाहेबांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणूया असे आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले.
दरम्यान गेल्या दहा वर्षात लोकांपर्यंत न पोचलेले विनायक राऊत आता भावनिक आव्हान करून आपल्याला साथ देण्याची हाक देतात परंतु मतदार आता हुशार झाले असून ते योग्य उत्तर आता मतपेटीतून देतील असा टोला देखील यावेळी केसरकर यांनी हाणला. येथील मळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यक्रमात.श्री केसरकर बोलत होते.
यावेळी केसरकर पुढे बोलताना म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी देशात अनेक विकासा कामे केली ती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आपले काम आहे त्यामुळे येणाऱ्या काळात देश आपल्या प्रगतीपथावर न्यायचं असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ द्यावी व रत्नागिरी सिंधू मधून राणी यांना मोठ्या मताधिक्याने आपण निवडून आणायचा आहे त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करूया असेही यावेळी त्यांनी आवाहन केले.