वरून सरदेसाई:महाविकास आघाडीच्या मशाल फेरीला उत्स्फुर्त प्रतिसाद..
⚡सावंतवाडी ता.२४-: बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना म्हणणाऱ्यांनी कोकणातून शिवसेना हद्दपार केली खरी शिवसेना असती तर त्यांनी निवडणुकीतून पळ का काढला ते धनुष्यबाणावर या ठिकाणी का लढले नाही असा सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे सचिव वरून सरदेसाई यांनी केला.
तर धगधगती मशाल मुंबईतच नव्हे तर दिल्लीपर्यंत धडक देणार असून कोकणात विनायक राऊत तिसऱ्यांदा हॅट्रिक कडून मशाल पेटवणार आहेत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सावंतवाडीत शहरात आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून मशाल फेरी काढण्यात आली या मशाल उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला शहरातील कवळीतिठा ते शिव उद्यान अशी ही मशाल फेरी काढण्यात आली या फेरीमध्ये वरून सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे मोठ्या प्रमाणात पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते प्रत्येकाने हातात भेटती मशाल घेऊन जोरदार घोषणाबाजी केली यावेळी कोकणचा खासदार कैसा हो विनायक राऊत जैसा हो अशा घोषणाही देण्यात आल्या. या फेरीमध्ये माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते,बाळा गावडे, समीर वंजारी ठाकरे सेनेचे सावंतवाडी तालुका संपर्कप्रमुख शैलेश परब गितेश राऊत रुची राऊत महिला जिल्हाप्रमुख जानवी सावंत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी काँग्रेसचे एडवोकेट दिलीप नार्वेकर तालुकाप्रमुख महेंद्र सांगेलकर ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार राष्ट्रवादीचे तालुकाप्रमुख पुंडलिक दळवी बाब्या मापसेकर सुनील गावडे राघवेंद्र नार्वेकर विनोद ठाकूर व शिवदत्त घोगळे रश्मी माळवदे सायली दुभाषी महेश शिरोडकर सागर नाणोसकर ,कौतुभ गावडे,आधी महा विकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मशाल फेरीची सांगता झाल्यानंतर श्री देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले, कोकणात शिवसेना वाढली कोकणने मुंबईतही शिवसेना वाढविण्यास सहभाग घेतला कोकण आणि बाळासाहेब ठाकरे यांचे अनोखे नाते होते बाळासाहेब ठाकरे यांचे कोकणावर नितांत प्रेम होते त्यामुळे आत्ताच्या निवडणुकीत पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनाच येथील जनता पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आणतील. जे कोण बाळासाहेबांचीच खरी शिवसेना असे सांगत होते त्यांनी कोकणात आता निवडणूक काल लढवली नाही निवडणुकीतून का पळ काढला त्यामुळे त्यांना खरे शिवसेना म्हणण्याचा अधिकार नाही शिवाय जे कोण आमच्यावर आरोप करत आहे त्यांनीच कोकणातून शिवसेना हद्दपार केली त्यामुळे त्यांना आमच्यावर बोलण्याचा अधिकार नाही