⚡सावंतवाडी ता.१८-: चितारआळी गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तसेच घरातील चेतन बेंगल स्टोअर्स चे मालक अशोक गुप्ता (80) रा.भटवाडी यांचे सकाळी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक काॅलेजमध्ये उपचारादरम्यान निधन झाले.
ते मुळचे दिल्ली येथील होते मात्र ते गेली कित्येक वर्ष व्यवसायानिमित्त सावंतवाडीत स्थानिक झाले होते. बांगड्यांचे मोठे व्यापारी म्हणून ते परिचित होते. उभाबाजार चितारआळी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी रोटरी क्लबचे अध्यक्षपद भासविले होते. त्याच्या पश्चात तीन मुली मुलगा नातवंडे असा परिवार आहे.
