मालवण (प्रतिनिधी)
मालवण गवंडीवाडा येथील श्रीराम मंदिराच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवास उद्या सोमवारी दि. ८ एप्रिल पासून भव्य शोभयात्रेने प्रारंभ होत असून २३ एप्रिल पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्त आज घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात १०१ रक्तदात्यानी रक्तदान केले .
मालवण गवंडीवाडा येथील पुरातन अशा श्रीराम मंदिराच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्त दि. ८ एप्रिल सायंकाळी ४ वाजता सवाद्य शोभायात्रा – राम मंदिर ते मकरोबा मंदिर, गणेश येशू मंदिर, भवानी माता मंदिर, गंगाबाई मंदिर ते राम मंदिर, ९ एप्रिल रोजी गुढीपाडवा, संपूर्ण राम कथा विषयाचे कीर्तने, सायंकाळी ७ वाजता ह. भ. प. अक्षय सातार्डेकर यांचे कीर्तन, १० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता सामूहिक सत्यनारायणाची महापूजा, सायंकाळी ७ वाजता ह. भ. प. मेघा शेवडे यांचे कीर्तन, ११ एप्रिल सायंकाळी ७ वाजता ह. भ. प. अक्षय परुळेकर यांचे कीर्तन, १२ एप्रिल सकाळी ९ वाजता गणपती पूजन, पुण्याहवाचन, देवता स्थापन, पंचसुक्त जप, सायंकाळी ५ ते ७ आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ संस्थापक आचार्य कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद ए. सी. भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद, श्री श्री राधा गोपीनाथ मंदिर गिरगाव चौपाटी मुंबईतर्फे श्रीरामकथोत्सव कथा शबरी महात्म्य – प्रवक्ता श्रीमान मदनगोपालदास सायंकाळी ७ वाजता ह. भ. प चिंतामणी सामंत यांचे कीर्तन.
दि. १३ एप्रिल सकाळी ९ वाजता पंचसुक्त नाम जप अग्री स्थापन ग्रहयज्ञ सायंकाळी ५.३० ते ७ वाजता भजन कीर्तन कथा सीता महात्म्य प्रवक्ता श्रीमान मदनगोपालदास, सायंकाळी ७ वाजता विलास केरकर यांचे कीर्तन, १४ एप्रिल सकाळी ९ वाजता हवन, सुंदरकांड हवन, बलिदान पूर्णाहूती, अभिषेक, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ५.३० वाजता भजन कीर्तन कथा गितरामायणाची अपूर्वाई प्रवक्ता नीलकृष्ण दास, सायंकाळी ७ वाजता ह. भ. प. पंकज बटा यांचे कीर्तन, १५ एप्रिल सायंकाळी ७ वाजता ह. भ. प. विनोद सातार्डेकर यांचे कीर्तन, १६ एप्रिल सायंकाळी ७ वाजता ह. भ. प. महेश धामापूरकर याचे कीर्तन, १७ एप्रिल सकाळी ११ वाजता ह. भ. प. बाळ कासरलकर यांचे कीर्तन, दुपारी १२ वाजता श्रीरामजन्म, दुपारी १२.३० ते ३ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता अष्टपैलू कलानिकेतन यांचे भजन, रात्री ९ वाजता आंगणेवाडी नाट्यमंडळ, मुंबई यांचे केदार शिंदे लिखित तुफान विनोदी नाटक ‘श्रीमंत दामोदरपंत’ (दिग्दर्शक महेश सावंत पटेल, नेपथ्य शरद कांबळी, रंगभूषा तारक कांबळी, ध्वनी दादा परसनाईक).
दि. १८ एप्रिल दुपारी ३ वाजता श्री संत नामदेव महाराज भजन मंडळ यांचे भजन, सायंकाळी ७ वाजता श्री देवी देवकीमाता भजन मंडळ न्हिवे यांचे भजन, रात्री ९ वाजता श्री गोपाळकृष्ण कला मंच यांचे मदन राजवाडकर लिखित दोन अंकी तुफान विनोदी नाटक ‘लव लवर जिंदाबाद, दि. १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता दांडेश्वर प्रासादिक भजन मंडळ यांचे भजन बुवा उत्कृष्ट आचरेकर, सायंकाळी ७ वाजता लिंगरवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, पोखरण कुडाळ यांचे भजन बुवा समीर कदम, रात्री १० वाजता वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली निर्मित पु. ल. देशपांडे लिखित संगीत ‘तुका म्हणे आता’ नाटक (दिग्दर्शक रघुनाथ कदम, नेपथ्य अंकुश कांबळी, संगीत मंगेश कदम, मृदुंग वैभव आचरेकर, निर्मिती स्वाती राजेंद्र – कदम), २० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता श्रीकृष्ण महिला भजन मंडळ, रात्री १० वाजता श्री समर्थ प्रासादिक नाट्यमंडळ गवंडीवाडा यांचे दोन अंकी विनोदी नाटक ‘देवचार’, लेखक – जितू तिरोडकर, दिग्दर्शक रोहित परुळेकर, संगीत दादा मंडलिक. दि. २१ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता प्रदीप सामंत यांचे भजन, रात्री ९ वाजता स्थानिक महिलांचे विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम मिळून साऱ्याजणी २२ रोजी सायंकाळी ७ वाजता श्री देवी सातेरी भजन मंडळ, कांदळगाव यांचे भजन, रात्री १० वाजता विविध सांस्कृतिक मनोरंजनाचे कार्यक्रम व ‘ठसका’ ही एकांकिका, २३ एप्रिल रोजी सायंकाळी ५.४५ वाजता ह. भ. प. बाळ कासरलकर यांचे कीर्तन, सकाळी ७ वाजता श्री हनुमान जन्म, सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा आणि तीर्थप्रसाद, सायंकाळी ७ वाजता भद्रकाली भजन मंडळ रेवंडी बुवा सिद्धेश कांबळी, रात्री ९ वाजता श्री समर्थ रामदास प्रासादिक नाट्यमंडळ गवंडीवाडा यांचे ऐतिहासिक दोन अंकी नाटक ‘वीर बाजी’ हे सादर होणार आहे. या सोहळ्यात भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
