गडमठ येथील रक्तदान शिबिरात २४ जणांचे रक्तदान…

वैभववाडी प्रतिनिधी
हुमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व विवेकानंद नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने कै सौ शिला शांतनु बांदोडकर यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 24 रक्तदात्यांनी गडमठ येथे केले रक्तदान. तर शंभरहु अधिक ग्रामस्थांनी मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला.


या कार्यक्रमाचे उद्घाटक वैभववाडी पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, हुमन राईट असोसिएशनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, सिंधू रक्त मित्र प्रतिसाद यांचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडुलकर, गडमठ गावच्या सरपंच सौ मालती शेटे सिंधू मित्र वैभववाडी अध्यक्ष राजेंद्र पडवळ तालुका अध्यक्ष संजय शेळके प्रणय बांदोडेकर संजय खानविलकर, हु्यमन राईट चे जिल्हा सचिव परब मालवण तालुका अध्यक्ष श्री धुरी आदी मान्यवर उपस्थित होते.
वुमन राईट असोसिएशन फोर कोटेशन वैभववाडी तालुक्याचे उपाध्यक्ष प्रणव बांदोडकर यांनी आपल्या मातोश्री कै सौ शीला बांदिवडेकर यांच्या जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी शिबिराचा आयोजन गडबड येथे करण्यात आले होते.
फोटो रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना पोलीस निरीक्षक अवसरमोल संतोष नाईक सरपंच मालती शेटे छाया संजय शेळके वैभववाडी

You cannot copy content of this page