ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत रेकोबा हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचे सुयश…

⚡मालवण ता.०५-: मालवण वायरी येथील डॉ. शिरोडकर एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता सातवीतील विद्यार्थी कु. वेद प्रवीण कुबल याने ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत सुवर्णपदक पटकावले आहे. त्याला १०० पैकी ८७ गुण मिळाले.

तसेच इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी कु. वेदिका परशुराम लुडबे हिने १०० पैकी ७५ गुण मिळवत यश मिळविले. या दोन्ही विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी शिक्षक पी. पी. कुबल यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page