देव बारावस व श्री रवळनाथ यांची स्थापना व तुळशीवृंदावन उद्यापन सोहळ्यास उद्योजक विशाल परब यांची उपस्थिती…

⚡दोडामार्ग ता.०५-:
श्री देवी माऊली पंचायतनातील “श्री देव बारावस व महादेव पंचायतनातील प्रमुख देवता श्री रवळनाथ” यांची स्थापना व तुळशीवृंदावन उद्यापन सोहळा कोलझर ता.दोडामार्ग येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते विशाल परब यांनी उपस्थित राहून देव देवतांचे मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद घेतले.

तसेच सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना व्यक्त केली. प्रसंगी परब यांनी ग्रामस्थांनी केलेल्या सन्मानाचा स्वीकार करून आभार मानले.

You cannot copy content of this page