चौकुळ येथील घटना: अधिक उपचारासाठी सावंतवाडी रुग्णालयात हलविले…
⚡आंबोली.ता.०५-: चौकुळ येथील सीताराम विश्राम गावडे(वय ८०)खालचीवाडी(देवळाकडे) याना घराच्या मागे सकाळी ७ वाजता एका गव्याने हल्ला केला.तसेच हाताला चावा घेतला. यात ते जखमी झाले.खांद्याला तसेच हाताला जखम होऊन मार लागला आहे.यानंतर तेथील नातेवाईकांनी आंबोली आरोग्य केंद्रात दाखल केले.
याठिकाणी अधिक उपचार केल्यानंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.त्याठिकाणी एक वयस्क गवा असून तो हल्ला करत असल्याचे तेथील लोकांकडून सांगण्यात येत आहे.
