पाटकर हायस्कूलमध्ये वन दिन व हवामान दिन संपन्न…

⚡वेंगुर्ला ता.०३-: येथील रा.कृ.पाटकर हायस्कूलमध्ये सामाजिक वनिकरण विभाग सिधुदुर्ग यांच्यावतीने राष्ट्रीय हरित सेना विभागामार्फत वन दिन व हवामान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

  यानिमित्त कलाशिक्षक तथा हरितसेना शिक्षक समिर पेडणेकर यांनी निसर्गात राहून चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. यात दूर्वा गावडे-प्रथम, रिशिता बोवलेकर-द्वितीय, मनस्वी पाटकर-तृतीय, वैष्णवी पडवळ व संस्कार शारबिद्रे-उत्तेजनार्थ यांना गौरविण्यात आले. यावेळी वेंगुर्ला विभाग वनपाल बागुल, मुख्याध्यापक आत्माराम सोकटे, महेश बोवलेकर, एम.एम.खरात, यु.एन.मांजरेकर आदी उपस्थित होते.
You cannot copy content of this page